PF 5Month Funda: एम्प्लॉइ प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून पब्लीक प्रॉविडंट फंड ही सरकारी स्किम चालवण्यात येते. निवृत्तीसाठी दीर्घकालिन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पीपीएफ हा उत्तम पर्याय मानला जातो. निवृत्तीचा विचार करुन तुम्ही न चुकता पैसे जमा करता. पण तुमची एक चूक लाखोचे नुकसान करु शकते, तुम्हाला माहिती आहे का?,तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर लाखोंचं नुकसान नको असेल तर एका तारखेकडे लक्ष ठेवाव लागेल.कोणती आहे ही तारीख?, काय होतो याने फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
दर महिन्याच्या 5 तारखेच्याआधी पैसे गुंतवावे, असा सल्ला पीएफ गुंतवणुकदारांना दिला जातो. पीएफ गुंतवणूकदारांमध्ये 5 तारखेचा फंडा प्रचलित आहे.
ईपीएफओच्या नियमानुसार पीएफ अकाऊंटमध्ये सरकार वार्षिक व्याज देते. दर महिन्याला या रक्कमेवर इंट्रेस्ट जमा होतो. दर महिन्याची शेवटची तारीख आणि पुढच्या महिन्याची 5 तारीख या काळात तुमच्या अकाऊंटमध्ये जितकी रक्कम असेल त्याआधारे इंट्रेस्ट कॅल्क्युलेट होतो. म्हणजेच या काळात तुमच्या खात्यात जितकी रक्कम असेल, त्याआधारे तुम्हाला इंट्रेस्ट मिळत राहीलं. या अवधीनंतर तुम्ही पैसे टाकत असाल तर त्यावर इंट्रेस्ट मिळेत नाही.
काही लोक पीएफ अकाऊंटमध्ये दरमहिन्याला पैसे टाकतात. तर अनेकजण एकदाच मोठी रक्कम गुंतवतात. जे गुंतवणुकदार लमसम पैसे गुंतवतात, त्यांनी येथए लक्ष द्यायला हवे.पीएफ अकाऊंटमध्ये वर्षाला दीड लाखापर्यंत गुंतवणूक करता येते. तुम्ही ही गुंतवणूक दरमहा, 6 महिन्याने किंवा वार्षिकदेखील करु शकता. काही लोक वर्षातून एकदाच दीड लाख रुपये गुंतवतात. हीच रक्कम तुम्ही महिन्याच्या 5 तारखेच्या आत डिपॉझिट केलात तर त्या डिपॉझिटवर व्याज कॅल्क्युलेट करुन मिळेल.
एका उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेऊया.
समजा तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये 5 लाख आधीपासूनच डिपॉझिट आहेत. आता 5 तारखेच्या आत तुम्ही दीड लाखाची रक्कम जमा केलात. तर तुम्हाला सध्याचा चालू व्याजदर 7.1 टक्क्यानुसार इंट्रेस्ट कॅल्क्युलेट केला जाईल. आता दीड लाखाच्या रक्कमेवर सिम्पल इंट्रेस्ट पाहिला तर वार्षिक 10 हजार 650 रुपये व्याज मिळेल.
यासोबतच तुमच्या आधीच्या डिपॉझिट रक्कमेवर व्याज आणि त्यावर कम्पाऊंडींगचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही 5 तारखेच्या नंतर गुंतवणूक केली तर तुम्हाला केवळ 11 महिन्याचा इंट्रेस्ट मिळेल. त्या महिन्याचा इंट्रेस्ट मोजला जाणार नाही, हे लक्षात असू द्या.