PF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?

PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला  UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात

Updated: Jan 12, 2023, 11:41 AM IST
PF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते? title=

EPFO Update : जे लोक नोकरी करतात, त्यांच्या पगारातून PFची ठराविक रक्कम कापली जाते. (Provident Fund) आपल्याला जमा झालेल्या पीएफमधून गरज भासल्यास आपण रक्कम काढू शकतो. प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनच्या नियमांनुसार, दरमहा कर्मचार्‍यांच्या पगारातून एक ठराविक रक्कम कापली जाते. यापैकी 8.3 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत आणि 3.67 टक्के रक्कम दरमहा ईपीएफमध्ये जमा होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) पीएफ खातेधारकांना युनिव्हर्सल खाते क्रमांक म्हणजेच यूएएन (UAN) क्रमांक देते. या नंबरद्वारे तुम्ही पीएफची माहिती किंवा पैसे काढू शकता. मात्र, तुमच्याकडे UAN नंबर नसेल तर अडचण निर्माण होते. आता हा UAN नंबर नसेल तरीही तुम्ही पीएफमधून पैसे काढ शकता. याबाबतची प्रक्रिया जाणून घ्या.

 PF अकाऊंटमधून UAN नंबरशिवाय पैसे काढू शकता

तुम्हाला पैशाची गरज आहे. मात्र, तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही PFचे पैसे आपत्कालीन परिस्थितींत काढू शकता. त्यासाठी UAN क्रमांक हा महत्वाचा असतो. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर काही लोकांकडे UAN क्रमांक नसतो. तुमच्याकडे UAN नंबरही नसेल तर घाबरण्याची गरज नाही. शिल्लक पीएफ जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरुन 011-229014016 वर मिस कॉल देऊन पीएफची रक्कम चेक करु शकता.

पीएफ खात्यातून UAN नंबरशिवाय पैसे काढण्यासाठी तुम्हाला स्थानिक पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. तेथे एक नॉन कम्पोझिट फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुम्ही PF खात्यातून पैसे काढू शकाल. मात्र, पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी तुम्हाला UAN क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक आवश्यक असेल. तसेच रजिस्टर मोबाईलनंबरही महत्वाचा आहे. यावर ओटीपी येतो. त्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकता.

तुम्हाला हे माहित आहे का?

नोकरदार वर्गासाठी EPFO कार्यालयाने विम्याचे कवचही दिले आहे. ​​EPFOने आपल्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे संरक्षण दिले आहे. मात्र, अनेक ग्राहकांना याची माहिती नसते, त्यामुळे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.  EPFO कडून ​​कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि पेन्शनसह विमा संरक्षण देण्यात येते. 1976 पासून ईपीएफओमधील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जात आहे. परंतु अनेकांना याबाबत माहित नाही.

तसेच नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) ही योजना लागू केली आहे. ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयुक्तपणे काम करते. या योजनेत नोकरीदरम्यान एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास EPFO ​​कडून त्याच्या नॉमिनी अर्थात वारसदाराला आर्थिक मदत म्हणून 7 लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.