नवी दिल्ली: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत, 2,000 रुपयांचे तीन हप्ते म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा शासनाचा उद्देश आहे. (PM Kisan scheme/PM kasan maandhan pension scheme)
यासोबतच पीएम किसान मानधन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पेन्शनचीही सुविधा आहे. जर तुम्ही पीएम किसान मध्ये खातेदार असाल तर तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची गरज भासणार नाही. तुमची थेट नोंदणी पीएम किसान मानधन योजनेतही केली जाईल. या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेऊ या.
हेदेखील वाचा - सिंगल चार्जमध्ये 100 किमी धावणारी ई-सायकल; बॅटरीसोबत पेडल असिस्टचीही सुविधा
पीएम किसान मानधन योजना काय आहे?
पीएम किसान मानधन योजनेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनची तरतूद आहे. 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याला किमान मासिक 3000 रुपये पेन्शन मिळते.
हमी पेन्शन कसे मिळवायचे?
पीएम किसान मानधनमध्ये फॅमिली पेन्शनचीही तरतूद
हेही देखील वाचा - IAS Success Story | फक्त 1 वर्ष अभ्यास करून 22 व्या वर्षी बनली IAS; कसे ते वाचा
पीएम किसान लाभार्थ्यांना कसा फायदा होईल?
पीएम किसान योजनेंतर्गत, सरकार पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते.
जर त्याचे खातेदार निवृत्तीवेतन योजना पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाले असतील तर त्यांची नोंदणी सहज होईल.
तसेच, जर शेतकऱ्याने हा पर्याय निवडला, तर पेन्शन योजनेत दरमहा कपात करण्यात येणारे योगदानही या 3 हप्त्यांमध्ये मिळणाऱ्या रकमेतून कापले जाईल. म्हणजेच, यासाठी पीएम किसान खातेधारकाला खिशातून पैसे गुंतवावे लागणार नाहीत.
गुंतवणूक कशी करावी?
पीएम किसान मानधन पेन्शन योजनेत, तुम्हाला दरमहा किमान 55 रुपये आणि कमाल 200 रुपये गुंतवावे लागतील. ही गुंतवणूक वयानुसार करावी लागते.
या संदर्भात, एका वर्षात, तुम्हाला कमाल 2400 रुपये आणि किमान 660 रुपये भरावे लागतील.
6 हजार रुपयांमधून जास्तीत जास्त 2400 रुपये वजा केले तरी, सन्मान निधीचे 3600 रुपये तुमच्या खात्यात शिल्लक राहतील. आणि त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला दरमहा 3 हजार पेन्शनचा लाभ मिळू लागेल.
यासोबतच 2000 चे 3 हप्ते देखील वर्षाला येत राहतील.
हेही वाचा - आता नोकरी सोडणंही महागणार; नोटीस पीरियडमध्ये भरवा लागणार कर
पेन्शन योजनेची खास वैशिष्ट्ये