'FONI' चक्रीयवादळ: ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी

चक्रीयवादळामुळे ओडिशामध्ये मोठं नुकसान

Updated: May 6, 2019, 11:40 AM IST
'FONI' चक्रीयवादळ: ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींकडून हवाई पाहणी title=

भुवनेश्वर : पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रीय वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी यावेळी वादळामुळे प्रभावित असलेल्या भागांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री नवीन पटनायक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्यपाल गणेशी लाल यांनी भुवनेश्वर एअरपोर्टवर पंतप्रधानांना रिसिव्ह केलं. पंतप्रधानांनी राज्यातील नुकसान झालेल्या भागाचा हवाई पाहणी केली.

शुक्रवारी ओडिशामध्ये आलेल्या फनी या वादळामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमधील १४,८३५ गावांमधील जवळपास १.८ कोटी लोकांचं नुकसान झालं आहे. राज्यात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पाणी आणि वीज नसल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

२४ तासात १३.४१ लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी काही भागांमध्ये खाद्य सुरक्षा कायद्या अंतर्गत येणाऱ्या कुटुंबियांसाठी 50 किलो तांदुळ, २००० रोख आणि पॉलिथीन शीट देण्याची घोषणा केली आहे.