India's 75th Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले हे आवाहन

पंतप्रधान मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात याबाबत देशवासियांना आवाहन केले आहे

Updated: Jul 31, 2022, 02:29 PM IST
India's 75th Independence Day: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केले हे आवाहन title=

PM Modi Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) या  रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले आहे. देशाच्या आगामी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी आतापर्यंत केलेल्या तयारीची माहिती देऊन पंतप्रधानांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.

तसेच 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान सोशल मीडिया प्रोफाइलवर आपला प्रोफाईल फोटो म्हणून "तिरंगा" ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

मी आवाहन करतो की 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत देशभरातील लोकांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

पंतप्रधान म्हणाले की, "यावेळची स्वातंत्र्यदिनाची मोहीम खूप खास आहे. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी करण्यात आली आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा सर्वात मोठा संदेश हा आहे की आपण सर्व देशवासीयांनी आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने पाळले पाहिजे. तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करू शकू आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवू शकू."

"स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सव जनआंदोलनाचे रूप धारण करत असल्याचे पाहून मला खूप आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोक याशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत, असेही मोदी म्हणाले