नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मेला नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्यासाठी हा दौरा असेल. ११ मेला काठमांडू आणि जनकपूरला पंतप्रधान मोदी जातील. पंतप्रधान मोदींचा हा तिसरा नेपाळ दौरा आहे. पण २०१५ मध्ये नेपाळी संविधानाच्या घोषणेनंतर हा पंतप्रधान मोदींचा पहिला दौरा आहे.
काही दिवसांपूर्वीच नेपाळचे पंतप्रधान ओली आपल्या पहिल्या दौऱ्यात भारतात आले होते. ३ दिवसाच्या या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात संरक्षण आणि व्यापार अशा मुद्द्यावर सहयोगाबाबत चर्चा झाली. भारत आणि काठमांडूमध्ये कनेक्टिविटी वाढवण्यासाठी देखील यावेळी चर्चा झाली.