मोदींचा चीनला टोमणा, कोणत्याच देशाच्या भुभागावर नजर ठेवत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला जोरदार टोमणा मारला आहे.

Updated: Jan 9, 2018, 07:49 PM IST
मोदींचा चीनला टोमणा, कोणत्याच देशाच्या भुभागावर नजर ठेवत नाही title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला जोरदार टोमणा मारला आहे. भारत कधीच दुसऱ्या देशाचा भूभाग आणि संसाधनांवर नजर ठेवत नाही. भारताचं विकासाचं मॉडेल एका हातानी घ्या आणि दुसऱ्या हातानी द्या, असं आहे, असं मोदी म्हणालेत. भारतीय उपखंडामध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाबाबत मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.

प्रथम प्रवासी भारतीय सांसद संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदींनी चीनचं नाव न घेता ही टीका केली आहे. भारतानं जगभरात कायम सकारात्मक भूमिका निभावली आहे. महात्मा गांधींच्या अहिंसेनंच कट्टरपंथीयांचा मुकाबला करता येईल, असं मोदी म्हणालेत.

देशामध्ये येणाऱ्या गुंतवणुकींपैकी अर्ध्या गुंतवणुकी मागच्या तीन वर्षांमध्ये आल्या आहेत. मागच्या वर्षात देशात १६ अरब डॉलरची गुंतवणूक आल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे. तसंच मागच्या तीन वर्षांमध्ये भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय कारण भारतच बदलला आहे, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.