नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या 'मन की बात'मध्ये (Man ki Baat) बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी सुर-सम्राज्ञी लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय संपूर्ण जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
'मन की बात'मध्ये मोदींनी मुलींच्या सन्मानार्थ यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर देशभरात सन्मान अभियान चालवले जाण्याचे सांगितले.
'सेल्फी विद डॉटर'प्रमाणेच 'भारत की लक्ष्मी' (#BharatKiLaxmi)हे अभियान चालवले जाणार असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावर #BharatKiLaxmi हा हॅशटॅग अधिकाधिक वापरण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
मोदींनी 'मन की बात'मध्ये देशातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबांना 'stress free exam'संबंधी त्यांचे अनुभव, सूचना याबाबत सुचवण्याचे सांगितले. त्यावर विचार करुन जे योग्य वाटेल ते त्यांच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
देश के सारे विद्यार्थियों, टीचर और परिजनों से मेरा आग्रह है कि आप स्ट्रेस फ्री इग्जाम से जुड़ें पहलुओं को लेकर के अपने अनुभव मुझे बताइए, सुझाव बताइए।
उस पर मैं सोचूंगा और उसमें से जो मुझे ठीक लगेगा उसको मैं मेरे अपने शब्दों में लिखने का प्रयास करूंगा: पीएम मोदी #MannKiBaat pic.twitter.com/OBlDeREupx
— BJP (@BJP4India) September 29, 2019
e-cigarette घातक नसल्याची चुकीची धारणा निर्माण करण्यात आली होती. ई-सिगारेटच्या नशेमुळे, आपला तरुण देश चुकीच्या मार्गाने न जाण्यासाठी ई-सिगारेटवर बंदी घालण्यात आली असल्याचे मोदींनी सांगितले.
आपण गांधी १५०, साजरा करत असताना, १३० कोटी जनतेसह single use plastic पासून मुक्त होण्याचा संकल्प करत असल्याचे ते म्हणाले. २ ऑक्टोबर रोजी single use plastic पासून मुक्ती होण्यासाठी करण्यात येणाऱ्या अभियानाचा हिस्सा बनण्याचे आवाहनही त्यांनी केले.
३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. #एकभारत_श्रेष्ठभारत आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आणि त्याच निमित्ताने ३१ ऑक्टोबरला #RunForUnity अभियान चालवण्याचे, देशाच्या ऐकतेसाठी एकत्र येण्याचे ते म्हणाले.
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन मोदींनी २०२२ पर्यंत भारताच्या १५ ठिकाणांना भेट देण्याचे सांगितले होते. त्याविषयी बोलताना त्यांनी जनतेला, भारतातील विविध ठिकाणांना भेट द्या, त्याला समजून घेऊन तुमचे अनुभव शेअर करण्याचेही सांगितले. भारताने TTCI मध्ये (Transportation Technology Center, Inc.) मोठी सुधारणा केली असून भारताचा यात ३४ क्रमांक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दिवाळीत फटाक्यांमुळे कोणतीही दुर्घटना, कोणत्याही व्यक्तीला नुकसान होऊ न देण्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकत्र येत नव्या संकल्पांसह मोठ्या उत्साहात सण साजरे करण्याचे त्यांनी सांगितले.