पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेता, Biden आणि Boris Johnson ना ही टाकलं मागे

जागतिक नेत्यांच्या या यादीत नोव्हेंबर महिन्यातच्या यादीतही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते.

Updated: Jan 22, 2022, 08:16 PM IST
पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेता, Biden आणि Boris Johnson ना ही टाकलं मागे title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी 71 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, कॅनडाचे अध्यक्ष जस्टिन ट्रुडो आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांसारखे नेतेही लोकप्रियतेच्या बाबतीत त्यांच्या मागे आहेत. जागतिक नेत्यांच्या या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 66 टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर, तर इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी तिसऱ्या क्रमांकावर 60 टक्के रेटिंगसह आहेत. 

तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन 43 टक्के रेटिंगसह 6 व्या स्थानावर आहेत. यानंतर सातव्या स्थानी कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रुडो येतात, त्यांनाही 43 टक्के रेटिंग मिळाले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 14 टक्के रेटिंग मिळाले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन 26 टक्के रेटिंगसह 13 व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर आहेत.

लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या या यादीत नोव्हेंबर महिन्यातच्या यादीतही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते.

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सध्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, यूके आणि यूएस मधील सरकारी नेत्यांचा मागोवा घेते आणि देशातील आघाडीच्या नेत्यांचे रेटिंग मंजूर करते.

मॉर्निंग कन्सल्टने त्यांच्या वेबसाइटवर सांगितले की, "नवीनतम रेटिंग 13 ते 19 जानेवारी 2022 दरम्यान गोळा केलेल्या डेटावर आधारित आहे. हे रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ नागरिकांच्या सात दिवसांच्या सरासरी सर्वेक्षणावर आधारित आहे. सर्वेक्षणमध्ये सहभागी झालेल्या लोकांची संख्या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी आहे."

मे 2020 मध्ये देखील या वेबसाइटने पंतप्रधान मोदींना सर्वाधिक 84 टक्के रेटिंग दिले होते, जे मे 2021 मध्ये घसरून 63 टक्के झाले होते.