नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. वाजपेयींवर ११ जूनपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ९४ वर्षांच्या अटलबिहारी वाजपेयींना मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आलं. गेल्या काही वर्षांपासून वाजपेयी हे डिमेंशियानं आजारी आहेत. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनीही एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतली होती. एम्स रुग्णालयाकडून वाजपेयींच्या प्रकृतीबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Prime Minister Narendra Modi reaches All India Institutes of Medical Sciences (AIIMS) to meet Former Prime Minister Atal Bihari Vajpayee. #Delhi pic.twitter.com/BeGhqVh0z2
— ANI (@ANI) August 15, 2018