'पीएम नरेंद्र मोदी’चित्रपटाची ८ एप्रिलला सुनावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारित्र्यावर निर्माण केला गेलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’हा चित्रपट वादात अडकला आहे. विरोधी पक्षांकडून याला जोरदार विरोध करण्यात येत आहे.

Updated: Apr 4, 2019, 09:27 PM IST
'पीएम नरेंद्र मोदी’चित्रपटाची ८ एप्रिलला सुनावणी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारित्र्यावर निर्माण केला गेलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’हा चित्रपट वादात अडकला आहे. विरोधी पक्षांकडून याला जोरदार विरोध करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने या चित्रपटाला हिरवी कंदील दिला असला तरी मात्र विरोधी पक्ष आणखी आक्रमक झालेले दिसत आहेत.‘पीएम नरेंद्र मोदी’चित्रपटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हा सिनेमा ५ एप्रिलला देशभरात प्रदर्शित होणार होता. पण काँग्रेसने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या  चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. या चित्रपटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ८ एप्रिल सुनावणी होणार आहे. म्हणून तुर्तास या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायमूर्ति एस.ए बोबडेच्या अध्यक्षतेखाली पीठाने या चित्रपटाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी करणार असे सांगितले.

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाच्या विरोधात 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई न्यायालयाच्या सुनावणी नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन्ही उच्च न्यायालयाने या चित्रपटांच्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्याचा नकार दिला आहे. हा चित्रपट पाहून मतदार प्रभावित होऊ शकतो असे याचिकाकर्ता आणि काँग्रेस प्रवक्ता अमन पवार यांनी म्हटले. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता पण सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ही पुढे गेली आहे. 

फिल्म 'पीएम नरेंद्र मोदी' पर 8 अप्रैल को सुप्रीम कोर्ट में होगी सुनवाई
 

हा चित्रपट महाराष्ट्रमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालय आणि इंदौर पीठाने ‘पीएम नरेंद्रे मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. दक्षिण भारतातील डीएमके पार्टीने सुद्धा या चित्रपटाला विरोध केला आहे. दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयने सोमवारी या गोष्टीचा निर्णय हा निर्वाचन आयोग करणार असे म्हटले.  या चित्रपटाच्या संदर्भात निवडणूक आयोगाला तक्रार देखील पाठविण्यात आली आहे.

फिल्ममेकर्स आणि विरोधी पक्ष पार्टी आपापले काम करत आहेत. चित्रपटाची कथा प्रेक्षकांपर्यत पोहचवण्याचे आपले उदिष्ट असल्याचे अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी म्हटले आहे. भविष्यात काय होणार हे मला माहीत नाही मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनावर सर्व लक्ष असल्याचेही तो म्हणाला.