नवी दिल्ली : देशात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका २०१८ च्या शेवटी होण्याची शक्यता वाढली आहे. कारण राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या भाषणात या मुद्याला सहमती दर्शवली तर आहेच, पण दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी एनडीए घटक पक्षांसमोर एकत्रित निवडणूकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावरून एनडीए घटक पक्ष आणि विरोधकांमध्ये एकमत झालं, तर विधानसभा-विधानसभा निवडणुकांनतर महिनाभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकसाथ घेतल्या जातील.
विधान तर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्यासाठी कायदा करावा लागेल
संसदेत लवकरच कायदा आणला जाईल
लोकसभा-विधानसभा निवडणुकांनतर महिनाभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घ्याव्यात
एनडीए घटक पक्षांनी सहकार्य करावे
एकत्रित निवडणूक घेण्याबद्दल लोकांना पटवून द्यावे
इतर पक्षांशी सकारात्मक चर्चा करावी