नवी दिल्ली : गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भावनगर येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ६१५ कोटी रुपये खर्च करुन बनवलेल्या घोघा-दहेजदरम्यान 'रो-रो फेरी' सेवेचा शुभारंभ केला.
या सेवेमुळे ३०७ किलोमीटरचं अंतर केवळ ३१ किमी झालं आहे. घोघा आणि दाहेज यांच्यातील अंतर पूर्वी रस्त्याच्या मार्गाने गाठण्यासाठी आठ तास वेळ लागत असे. मात्र, आता रो-रो फेरी सेवेमुळे हे अंतर केवळ ३१ किमीचं झालं आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीवर भाष्य केलं आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याची संधी लोकांना देत आहोत. नोटबंदीमुळे काळापैसा तिजोरीतून बँकांपर्यंत पोहोचला आहे. जीएसटीमुळे नवं बिझनेस कल्चर मिळालं आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, त्यांना घाबरण्याचं कुठलंच कारण नाहीये.
व्यापाऱ्यांनी घाबरण्याचं कारण नाहीये. जीएसटी लागू झाल्यानंतर जुन्या खात्यांची चौकशी केली जाणार नाहीये. प्रामाणिकपणे कमाई करता येऊ शकते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'रो-रो फेरी' सेवेचा शुभारंभ केला. या सेवेमुळे सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात या ठिकाणच्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, रस्त्याच्या मार्गाने सामान घेऊन जाण्यास नागरिकांना दिड रुपये खर्च येतो. तर समुद्राच्या मार्गाने सामान घेऊन गेल्यास आता २०-२५ पैसे खर्च येणार आहे.