कोरोना योद्ध्यांना सैन्य दल अशी देणार सलामी, पंतप्रधानांनी केलं स्वागत

सैन्यदलाच्या संकल्पनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे स्वागत केले 

Updated: May 1, 2020, 11:39 PM IST
कोरोना योद्ध्यांना सैन्य दल अशी देणार सलामी, पंतप्रधानांनी केलं स्वागत  title=

नवी दिल्ली : ३ मे रोजी भारतातील तीनही दल आपल्या खास अंदाजात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य, होमगार्ड, स्वच्छता, पोलीस, माध्यम कर्मचाऱ्यांना सलामी देणार आहेत. कोरोना वॉरीयर्सना सलामी देण्याच्या सैन्यदलाच्या संकल्पनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे स्वागत केले आहे. पंधप्रधानांनी ट्वीट करुन याबद्दल आनंद व्यक्त केला. 

आपल्या सशस्त्र सैन्याने देश नेहमीच सुरक्षित ठेवला आहे. संकटसमयी ते घराबाहेर पडून देशाची रक्षा करतात. आता आपले सैन्य वेगळ्या अंदाजात कोरोनाला हरवण्यासाठी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना धन्यवाद देणार आहेत. 

३ मेला भारताचे तीनही सशस्त्र दलाचे सैनिक आपल्या खास अंदाजात कोरोना योद्ध्यांना सलामी देतील. ३ मे च्या सकाळी वायुसेना श्रीनगर येथून तिरुअनंतपुरम पर्यंत आणि डिब्रूगड येथून कच्छ पर्यंत फ्लाय पास्ट करतील. सेनेचे जवान कोरोना उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाच्या बाहेर बॅंड वाजवणार आहेत. हॅलीकॉप्टर्समधून रुग्णालयांवर फूलांचा वर्षाव केला जाणार आहे.