पीएनबीच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबरपासून द्यावे लागणार जादा शुल्क

  पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी)  च्या ग्राहकांना सप्टेंबरपासून बँकेच्या दुसऱ्या शाखेत ५००० पेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यावर शुल्क लागणार आहे. शाखा त्याच शहरात असेल तरीही शुल्क द्यावे लागणार आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 7, 2017, 07:10 PM IST
पीएनबीच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, सप्टेंबरपासून द्यावे लागणार जादा शुल्क  title=

नवी दिल्ली :   पंजाब नॅशनल बँक ( पीएनबी)  च्या ग्राहकांना सप्टेंबरपासून बँकेच्या दुसऱ्या शाखेत ५००० पेक्षा अधिक रोख रक्कम जमा करण्यावर शुल्क लागणार आहे. शाखा त्याच शहरात असेल तरीही शुल्क द्यावे लागणार आहे. 

सध्या पीएनबीच्या ग्राहकांना शहरातील इतर शाखांमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक रक्कम देण्यावर शुल्क द्यावे लागते. 

काय आहे बँकेचे म्हणणे... 

पीएनबीने ग्राहकांना पाठविलेल्या नोटीशीत म्हटले आहे की, कर्जाशिवाय दुसऱ्या प्रकारात शुल्क (जीएसटी सामील नाही) संशोधीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आधार शाखेशिवाय शहरातील दुसऱ्या शाखेत ५ हजार रुपये जमा करण्यावर शुल्क लागणार आहे.  

ग्राहकला ५ हजारच्या वर रोख रकमेवर प्रति हजार रुपये एक रुपया शुल्क लागणार आहे. हे शुल्क अशा प्रकारे २५ रुपयांपर्यंत कमीत कमी असणार आहे. दुसऱ्या शहरातील शाखांमध्ये सप्टेंबरपर्यंत ५ हजार रुपयांपर्यंत मोफत असणार आहे. ही मर्यादा सध्या २५ हजार रुपये आहे. 

या शिवाय चेक परत आल्यासही त्याच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आता एक कोटी रूपयांचा चेक परत आला तर २००० रुपये शुल्क लागणार आहे. तर चेक बाउंस झाला तर २५०० रुपये शुल्क लागणार आहे. 

लॉकरचेही शुल्क वाढले... 

पीएनबीने महानगरांतील विविध प्रकारच्या लॉकर शुल्कातही वाढ केली आहे. लॉकरच्या भाड्यात २५ टक्क्याने वाढ केली आहे. यात महानगरता छोटे, मध्य आणि मोठे आणि आणखी मोठे आकारच्या लॉकरचे भाडे क्रमशः १५०० रुपये, ३५०० रुपये, ५५०० रुपये आणि १० हजार रुपये होणार आहे. 

यापूर्वी १२००, २८००, ४५०० आणि ८००० रुपये होते.