नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत गाजला. दोन्ही सभागृहात गोंधळामुळे कामकाज सुरू होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याच मुद्द्यावरुन लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. दरम्यान, आज राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संसद परिसरात काँग्रेसच्या खासदरांनी सरकारविरोधी निदर्शनं केली.
दरम्यान पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने आणखी चौघांना अटक केलीये.. यात निरव मोदी ग्रुपच्या दोन कर्मचा-यांचा आणि कंपनीच्या ऑडिटरचा समावेश आहे.
बमनीष बोसामिया, मितेन पंड्या, संजय रंभिया आणि अनियात रामन नायर अशी या चौघांची नावं आहेत.. त्यांना मुंबईच्या सत्र न्यायालयात हजार करण्यात आलं.. या सर्वांना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. या अगोदर पंजाब नॅशनल बॅंकेतील कर्मचारी आणि निरव मोदी यांना ज्यांनी अपहार करण्यात मदत केली त्यांच्या पोलीस कोठडीची मुदतही संपल्यानं त्यांनाही कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
आता या सर्वांना १९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. तर महिला आरोपी कविता मंकीकर हिला सूर्यास्तानंतर अटक केली असल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे, त्या विरोधात उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्या आलीये.