CNG PNG Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गॅस इतक्या रुपयांनी स्वस्त होणार

CNG PNG Price: मोदी सरकार लवकरच गॅसचे ( Natural Gas Rate) दर कमी करण्यासाठी विशेष योजना आखत आहे. यामुळे लवकरच घरगुती गॅस-सीएनजी स्वस्त होऊ शकतं.  

Updated: Nov 28, 2022, 07:18 PM IST
CNG PNG Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गॅस इतक्या रुपयांनी स्वस्त होणार title=

CNG PNG Price Updates :  दररोज मोठ्या प्रमाणात इंधनाचे दर (Fuel Rate) वाढतायेत. त्यामुळे सर्वसांमान्यांना महागाईचा सामना करावा लागतोय. मात्र केंद्र सरकारकडून (Central Government) सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मोदी (Modi) सरकार लवकरच गॅसचे (Gas Rate) दर कमी करण्यासाठी विशेष योजना आखत आहे. यामुळे लवकरच घरगुती गॅस-सीएनजी स्वस्त होऊ शकतं. सध्या वेगाने दररोज सीएनजी (Cng Rate) आणि एलपीजीच्या (Lpg) दरात मोठी  दरवाढ पहायला मिळतेय. सरकारचा नक्की प्लॅन काय आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (png and cng rate mat be decresed modi government plan about gas price rate in market)

गॅसच्या किंमतीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडून गॅस दराचं समीक्षा केली जाते.  या समितीकडून प्लानिंग केली जात आहे. त्यानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या ओल्ड फिल्डमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ठरवण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारच्या या निर्णयामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात घट पहायला मिळू शकते.

एका रिपोर्टनुसार, योजना आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारेख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करतेय. हे काम अंतिम टप्प्यात आहे. समितीकडून लवकरच सरकारसमोर अहवाल सादर केला जाणार आहे. 

संबधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, समिती 2 वेगवेगळ्या प्रकारच्या  मूल्य निर्धारण व्यवस्थेला प्रोत्साहन देऊ शकते. सोबतच ओएनजीसी (Ongc) आणि ऑईल इंडिया लिमिटेडच्या (Oil India Limited) फिल्डमधून येणाऱ्या गॅसची किंमती ठरवण्याबाबतही चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या 

Gold Investment Plan: गोल्डमध्ये गुंतवणूक करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण गणित

Vehicle Scrappage Policy : 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय