नवी दिल्ली : पोलिसांनी शनिवार रात्री एका मसाज पार्लरवर कारवाई केली. ज्यामध्ये पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा सुरु असल्याचा प्रकार समोर आला. हे मसाज पार्लर गुरुग्राम सेक्टर 43 मध्ये सुरु होतं. पोलिसांनी या कारवाईत दोन युवकांसह स्पा सेंटरच्या मॅनेजरला आणि एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी एक टीम बनवून स्पावर रेड टाकली.'
पोलिसांनी म्हटलं की, 'आमचा एक माणूस ग्राहक बनून स्पामध्ये गेला. रिसेपशनवर बसलेल्या मॅनेजरसोबत डील केल्यानंतर त्याला 3000 रुपये दिले. यानंतर एक माणूस आतमध्ये घेऊन गेला जेथे एक महिला आधीच बसली होती. आमच्या व्यक्तीने मिस कॉल देऊन याची सूचना दिली आणि यानंतर टीमने रेड टाकेली."