मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. सगळीकडे पक्षांनी जाहिरातबाजी सुरू केली आहे. सत्तारूढ भाजपाने त्यांचे समर्थक फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर जाहिराती देत आहेत. इतर पक्षांकडून सुद्धा फेसबूकवर मोठ्या प्रमाणात जाहिराती देत आहेत. फेसबुकवरील जाहिरातींचा खर्च 8.38 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, ज्यामध्ये भाजप आणि त्यांच्या समर्थकांचा सर्वाधिक हिस्सा आहे. सोशल मीडिया कंपनीने ही माहिती दिली आहे.
फेसबुकच्या अॅड लायब्ररीच्या अहवालानुसार, फेब्रुवारीपासून ते 16 मार्च 2019 पर्यंत एकूण राजकीय जाहिरातींची संख्या 34 हजार 48 एवढी होती. या जाहिरांतीमागचा खर्च 6.88 कोट्यांच्या घरात होता. 23 मार्च पर्यंत जाहिरांतींच्या संख्येत वाढ झाली आहे. जाहिरातींची संख्या 41 हजार 514 झली आहे. तर जाहिरातींवर एकूण 8.38 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.
'भारत के मन की बात' असे पृष्ठ असलेल्या जाहिरातींवर सर्वाधिक खर्च करण्यात आला आहे. दोन विभागांमध्ये आलेल्या जाहिरातींची संख्या एकूण 3 हजार 700 पेक्षा जास्त आहे. त्यासाठी एकूण 2.23 कोटी खर्च करण्यात आला आहे. भाजपाने फेसबूकवर 600 जाहिराती दिल्या आहेत. त्यांचा खर्च 7 लाख रूपये आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकूण 410 जाहिराती आहेत. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या जाहिरातींचा खर्च 5.91 लाख एवढा आहे. फेब्रुवारीमध्ये फेसबुकने असे म्हटले होते की, या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या राजकीय जाहिरातींबद्दल तपशील देण्यात येईल. यात जाहिरातींचे वर्णन करणाऱ्या लोकांची माहिती आहे. राजकीय जाहिरातींमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सोशल मीडियाने हे पाऊल उचलले आहे. जाहिराती पाहणाऱ्या लोकांसाठी जबाबदार लोकांबद्दल अधिक माहिती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.