मुंबई : योग्य मोबदला आणि सुरक्षित गुंतवणूकीची हमी म्हणजे (Post Office Schemes) पोस्ट ऑफीस. पोस्ट ऑफीसच्या विविध योजनांमध्ये अनेक जण गुंतवणूक करतात. या अनेक योजनांपैकी एक म्हणजे किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) . केंद्र सरकारने (Central Government) नुकतंच या किसान विकास पत्र योजनेवर मिळणाऱ्या व्याज दरातही (Intrest Rate) वाढ केली. तसेच दामदुप्प्टीच्या कालावधीतही घट केली होती. भविष्याच्या दृष्टीने गूंतवणुकीसाठी 'किसान विकास पत्र' योजना सर्वोत्तम आहे. (post office schemes kvp kisan vikas patra invest money will be double in 123 month know details)
दाम दुप्पटीसाठी किसान विकास पत्र ही सुपर योजना आहे. या योजनेत दाम दुप्पटीसाठी गुंतवणूक करतात. सरकारने नुकतंच या योजनेच्या कालावधीत घट आणि व्याजदरात वाढ केली. या योजनेचा व्याज दर आधी 6.9 टक्के होता, जो .1 टक्क्याने वाढवून 7 टक्के करण्यात आला आहे.
किसान विकास पत्र या योजनेची कालावधी ही 124 महिने इतकी होती. मात्र यात सरकारने 1 महिन्यांनी घट केली. त्यामुळे या योजनेचा कालावधी 123 महिने अर्थात 10 वर्ष 3 महिने इतका करण्यात आला आहे. हा बदल ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात आला आहे. या योजनेत किमान 1 हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. तर या योजनेसाठी कमाल मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. कोणतीही सज्ञान व्यक्ती (18+) या योजनेत गुंतवणूक करु शकतो. गुंतवणुकीसाठी नजिकच्या पोस्ट ऑफीसमध्ये संपर्क करु शकता.
या योजनेत गुंतवणुकीसाठी आधी पोस्टात खातं उघडावं लागेल. या योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाकडून कोणतीही सज्ञान व्यक्ती खातं उघडू शकते. जसं त्या मुलाचं वय 10 वर्ष होईल, त्यांनतर ते खातं त्याच्या नावावर ट्रान्सफर केलं जातं. तसेच या योजनेत 18 पेक्षा अधिक वयाचे 3 जण जॉईंट अकाउंटही (Joint Account) ओपन करु शकतात.
CNG PNG Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गॅस इतक्या रुपयांनी स्वस्त होणार