नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेच्या चालू मान्सून सत्रात वीज (सुधारणा) विधेयक, 2021 मांडणार आहे. या विरोधात देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
देशभरात म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी पावर कट होऊ शकतो. ऊर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आणि इंजिनिअर्सने संसदेच्या चालू मान्सून सत्रात वीज (सुधारणा) विधेयक, 2021 मांडण्याच्या विरोधात 10 ऑगस्टरोजी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार अखिल भारतीय विद्युत अभियंता संघाने ही माहिती दिली आहे.
15 लाख कर्मचारी संपावर जाणार
संघाने दावा केला आहे की, नवीन वीज विधेयकाला संसदेत मांडण्याच्या विरोधात देशभरातील वीज विभागातील 15 लाख कर्मचारी 10 ऑगस्ट रोजी संपावर जाणार आहेत.
नवीन विधेयकातील बदल
संघाने म्हटले आहे की, हे विधेयक घाईघाईत पारित करण्याऐवजी हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवायला हवे. वीज (सुधारणा)विधेयक,2021 अंतर्गत वीज ग्राहकाला दुरसंचार क्षेत्रासोबत आपला सेवादाता निवडण्याचा पर्याय उपलब्ध असेल