मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!'

तुमच्या बायकोन तुमच्याशी लग्न केलंय की सरकारी नोकरीशी? आजच तपासा 

Updated: Feb 14, 2022, 04:47 PM IST
मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!' title=

नवी दिल्ली: सरकारी नोकरी कोणाला नको असते. सरकारी नोकरी कोणाला नको असते. आयुष्यात प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला सरकारी नोकरी लागावी. त्यासाठी जीव तोडून प्रयत्न केला जातो. आता सरकारी नोकरी मिळणं खूपच कठीण झालं आहे. त्यामुळे लग्नातही सरकारी नोकरी करणारी मुलगा किंवा मुलगी हवी असंही काही ठिकाणी अट ठेवली जाते. 

आपल्या मुलीचं लग्न चांगल्या घरात व्हावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मात्र एका तरुणाचं त्याच्या रुपामुळे लग्न होऊ शकत नव्हतं. मात्र सरकारी नोकरीनं कमाल केली. ज्या स्थळानं नाकारलं तेच स्थळ पुन्हा होकार देण्यासाठी आलं. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

तोंड पाहून दिला नकार पण..

या व्हिडीओमध्ये तरुण सांगत आहे की  त्याचा चेहरा पाहून एका स्थळाने रिजेक्ट केलं होतं. त्यानंतर या तरुणाला सरकारी नोकरी लागताच ज्या स्थळाने नाकारलं ते लग्न करण्यासाठी एका पायावर तयार झाले. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तरुणीच्या घरचे एका पायावर लग्नासाठी तयार झाले. 

सरकारी नोकरीसाठी बांधली लग्नगाठ

तरुणीनं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारी नोकरी आहे म्हणून या तरुणीनं मुलाशी लग्न केलं आहे. memecentral.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रुपापेक्षा जास्त या तरुणाची सरकारी नोकरी पाहून तरुणीनं त्याच्याशी लग्न केलं आहे.