आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार; स्ट्रेचर अभावी प्रेग्नेट महिलेला घेऊन जाऊ लागलं 'या' अवस्थेत;पाहा VIDEO

ना स्ट्रेचर मिळाली, ना व्हिलचेअर... प्रेग्नेट महिला अर्धातास रूग्णालयाबाहेर ताटकळत, आरोग्य यंत्रणेची पोलखोल करणारा VIDEO पाहा 

Updated: Sep 28, 2022, 06:36 PM IST
आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार; स्ट्रेचर अभावी प्रेग्नेट महिलेला घेऊन जाऊ लागलं 'या' अवस्थेत;पाहा VIDEO title=

कौशाबी : कोरोना सारखी वैश्विक महामारी देशाने पाहिली,मात्र या महामारीतून आरोग्य यंत्रणा (Health Department) काहीच शिकली नाही. कारण या महामारीनंतरही रूग्णांची हेळसांड झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर टीका होत आहे.  
  
कौशाबी (Kaushambi) जिल्ह्याच्या सरसवा ब्लॉकमधील बक्षी का पुरा येथे राहणारे संतोष कुमार हे काबाडकष्ट करून आपलं घर चालवतात. त्याची पत्नी अन्नू ही प्रेग्नेंट होती. त्यादिवशी अचानक पत्नी अन्नू हिला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास प्रसूती वेदना होऊ लागल्या. अशा स्थितीत त्यांनी घाईघाईने पत्नीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (District Hospital) नेले. मात्र रूग्णालयात स्ट्रेचर उपलब्ध नव्हती. त्यामुळे साधारण त्याला अर्धा तास ताटकळत उभं रहाव लागलं. मात्र या दरम्यान पत्नीच्या प्रसूती वेदना जास्तच वाढतच होत्या. त्यामुळे वैतागून त्याने पत्नीला उचलून वॉर्डमध्ये नेले. 

या घटनेचा व्हिडिओ (Video Viral) एका व्यक्तीने काढला आणि तो सोशल मीडियावर (Social media) टाकला. यानंतर ही घटना चव्हाट्यावर आली होती. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी रूग्णालयाच्या कारभारावर टीका केली.  

पतीचा आरोप काय? 
संतोष कुमारने सांगितले की, रूग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे स्ट्रेचरची मागणी केली, मात्र अर्धा तास स्ट्रेचरच मिळाली नाही. या दरम्यान पत्नीच्या प्रसुती वेदना जास्तच वाढत असल्याने तिला आपल्या कुशीत घेऊन लेबर वॉर्डमध्ये पोहोचला,असे त्याने म्हटले आहे.  

कारवाईचे आदेश 
सीएमएस डॉ. दीपक सेठ यांनी याबाबत सांगितले की, जिल्हा रुग्णालयातील (District Hospital)  आपत्कालीन स्थितीत चार स्ट्रेचर आहेत. या स्ट्रेचरच्या सहाय्याने रुग्णांना वॉर्डात हलवले जाते. अशा आपत्कालीन स्थितीत अधिक रुग्ण आल्याने स्ट्रेचर रिकामे नसते,असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले.  

डॉ. दीपक सेठ पुढे म्हणाले की, ही घटना दुःखद असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासण्यात येत आहे. तपासणीनंतरच आपत्कालीन परिस्थितीत स्ट्रेचर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान ही घटना उत्तरप्रदेशच्या (Uttar pradesh) राज्यात घडली. ही घटना एकूण अनेकांकडून संताप व्यक्त होत आहे.