पंतप्रधान मोदींनी खास अंदाजात दिल्या राहुल गांधींना शुभेच्छा

या निमित्तानं काँग्रेसनं आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर करत राहुलला हॅपी बर्थडे म्हटलं

Updated: Jun 19, 2019, 03:55 PM IST
पंतप्रधान मोदींनी खास अंदाजात दिल्या राहुल गांधींना शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. 'राहुल गांधी यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी कामना' यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची शाब्दिक जुगलबंदी चांगलीच गाजली होती. या निवडणुकांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएनं बहुमतानं विजय प्राप्त केला. 

राहुल गांधी यांच्या वाढदिवसाला पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या निमित्तानं काँग्रेसनं आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर करत राहुलला हॅपी बर्थडे म्हटलं. या व्हिडिओत राहुल गांधी एका वेगळ्या अंदाजात दिसतात. राहुल गांधी यांच्याकडून लोकांना प्रेरणा घेता येईल, अशा पाच गोष्टी काँग्रेसनं या व्हिडिओद्वारे अधोरेखित केल्यात.

राहुल गांधी यांचा जन्म १९७० मध्ये आजच्या दिवशीच झाला होता. त्यांनी आज वयाची ४९ वर्ष पूर्ण केलेत.