रामदास आठवलेंची नव्या लोकसभा अध्यक्षांसाठी हटके कविता

रामदास आठवलेंच्या कवितेने पुन्हा एकदा खासदारांना हसवलं

Updated: Jun 19, 2019, 02:59 PM IST
रामदास आठवलेंची नव्या लोकसभा अध्यक्षांसाठी हटके कविता

नवी दिल्ली : ओम बिर्ला यांची आज लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी ओम बिर्ला यांना सभागृहातील सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक पक्षप्रमुखांनी देखील ओम बिर्ला यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या हटके स्टाईलमध्ये ओम बिर्ला यांना कवितेद्वारे शुभेच्छा दिल्या. या कवितेमुळे सभागृहात एकच हशा पिकला. रामदास आठवले हे लोकसभेचे सदस्य नाहीत. आठवले यांनी रिपाई पक्षाचे अध्यक्ष म्हणून लोकसभा सभागृहात भाषण केलं.

आठवलेंची भन्नाट कविता

एक देश का नाम है रोम
और लोकसभा के स्पीकर बन गए है बिर्ला ओम

लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम
वेल मे आने वालो का ब्लॅक लिस्ट में डालना है नाम

नरेंद्र मोदी और आपका दिल है विशाल
राहुलजी आप अब रहो खुशहाल

हम सब मिलकर हात मे लेते है एकता की मशाल
भारत को बनाते है और भी विशाल

आप का राज्य है राजस्थान
लोकसभा की आप बन गए है जान

भारत की हमे बढानी है शान
लोकसभा चलाने के लिए आप जैसा परफेक्ट है मॅन

रामदास आठवले यांची कविता एकून सभागृहातील सदस्य लोटपोट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांनादेखील ही कविता ऐकल्यानंतर हसु आवरता आले नाही.

काँग्रेसला टोमणा

यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रामदास आठवले यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसवर टीका केली. आठवले काँग्रेसला उद्देशून म्हणाले की 'आम्ही तुम्हाला सत्ता काबीज करु देणार नाही. मोदी सरकार पुढील निवडणूक देखील जिंकणार आहे.'

जेव्हा तुम्ही सत्तेत होतात, तेव्हा मी तुमच्यासोबत होतो, असे आठवले म्हणाले. यानंतर सभागृहातील सदस्य खळखळून हसले. काँग्रेस निवडणुकीआधी मला काँग्रेससोबत येण्यासाठी बोलत होते. पण मला मोदी लाट असल्याचे ठावूक होते, असे देखील आठवले म्हणाले.

कोण आहेत ओम बिर्ला ?

ओम बिर्ला हे लोकसभेचे १७ वे अध्यक्ष बनले आहेत. ओम बिर्ला हे राजस्थानमधून ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर २०१४ साली ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. यंदाची ही त्यांची खासदार म्हणून दुसरी वेळ आहे.