पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांचे प्रश्न टाळले!

नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातली पहिली पत्रकार परिषद घेतली. पण...

Updated: May 17, 2019, 08:00 PM IST
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांचे प्रश्न टाळले! title=

नवी दिल्ली : देशातल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातली पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली नाहीत. त्यांनी पत्रकारांचे प्रश्न टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत पहिलीच पत्रकार परिषद घेतली. मात्र या प्रश्नांना उत्तरं देणं टाळलं. पत्रकारानं प्रश्न विचारल्यानंतर पक्षाच्या शिस्तीनुसार अध्यक्ष सर्वश्रेष्ठ असल्यानं तेच उत्तरं देतील असं सांगून स्वत:ची सुटका करून घेतली. मात्र, १७ मे २०१४ लाच इमानदारीची सुरूवात झाली होती, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी यावेळी दिली.

मोदींनी यावेळी पाच वर्षांतील कामगिरीचा धावता आलेख मांडला आणि निवडणुकीच्या प्रचाराचेही अनुभव सांगितले. मात्र पत्रकारांच्या प्रश्नांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनीच उत्तरे दिली. एनडीएचे सरकार सत्तेत येणार असले तरी एकट्या भाजापला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. तर दुसरीकडे त्याचवेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मोदींना भ्रष्टाचारावर बोलण्याचे आव्हान दिले.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पत्रकार परिषद भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात घेतली. एका प्रश्नावर मोदी यांनी उत्तर द्यावे, असा आग्रह एका पत्रकाराने धरला होता. त्यावेळी 'भाजप अध्यक्षच आमच्यासाठी सर्व काही असतात, असे सांगत मोदी यांनी उत्तर देणे टाळले. त्यामुळे मोदी यांनी पत्रकारांना का टाळले, याचीच चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, जनतेचे आभार मानण्यासाठीच यंदाच्या निवडणुकीत प्रचार करायचा, असे मी मनात ठरवले होते.  प्रचारात कटाक्षाने ते पाळले. जनतेचा मोठा पाठिंबा लाभला. पाच वर्षांत देशाने अनेक चढउतार पाहिले, पण देश माझ्यासोबत राहिला. ही पत्रकार परिषदही आभार मानण्यासाठीच आहे, असे मोदी म्हणालेत. 
 
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होत आहे. आज सहा वाजता प्रचारतोफा थंडावत आहेत. तो धागा पकडून पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही निवडणूक उत्साहपूर्ण वातावरणात झाली. एकप्रकारची सकारात्मकता यावेळी पाहायला मिळाली. यानिवडणुकीत आपल्याला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.