महिला दिन : नारीशक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सलाम

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गज व्यक्तींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Mar 8, 2020, 11:10 AM IST
महिला दिन : नारीशक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सलाम title=

मुंबई : आताच्या युगात प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या दिवसाला देखील तितकच महत्त्व आहे. आज ८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस. संपूर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, असं म्हणत मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक महिला दिनी नारीशक्तीचा आदर आणि सन्मान करत मोदींनी आपल्या सोशल मीडियाचे नेतृत्व महिलांकडे सोपवणार आहेत. 'मी काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडिया सोडण्याच्या विचारत असल्याचं  जाहीर केलं होतं. आज दिवसभर कर्तृत्व गाजवणाऱ्या ७ महिला माझ्या सोशल अकांउंटवरून त्यांचा प्रवास, आणि त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी सांगणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याशी संवाद देखील साधणार आहेत.'

असं ट्विट करत मोदींनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर आज संपुर्ण दिवस त्यांच्या सोशल अकाउंटची धुरा ७ कर्तृत्ववान महिलांच्या हाती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गज व्यक्तींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.