पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली.

Updated: Dec 12, 2021, 07:31 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक! title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झालंय. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाउंट  काही काळासाठी हॅक झाले होतं. यानंतर ट्विटरशी बोलणी केल्यानंतर त्यांचं ट्विटर अकाउंट आता सुरक्षित आहे.

ट्विटर हॅक झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड करण्यात आली आहे. हे प्रकरण ट्विटरकडे नेण्यात आलं. त्यानंतर अकाऊंट सुरक्षित करण्यात आलं. खाते हॅक करताना जे काही छेडछाड केली गेली किंवा शेअर केली गेली त्याकडे दुर्लक्ष करावं."

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर 7 कोटी 34 लाख फॉलोअर्स आहेत. हॅक झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं अकाऊंट रिस्टोअर करण्यात आलं असून या काळात चुकीची माहिती देणारे ट्विट काढून टाकण्यात आलं आहे.

पीएम मोदींचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर, त्यांच्या हँडलवरून ट्विट करण्यात आलं की, "भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारलं आहे. सरकारने अधिकृतपणे 500 BTC खरेदी केली आहेत आणि ते देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना वितरित करण्यात येत आहेत."

pm modi twitter account hacked

पीएम मोदींच्या अधिकृत अकाऊंटवरून बिटकॉइनबाबत केलेलं ट्विट हॅकर्सने केलं. अकाऊंट हॅक होत असताना केलेल्या ट्विटकडे दुर्लक्ष करा, असं पीएमओंनी म्हटलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही पीएम मोदींची वैयक्तिक वेबसाइट आणि मोबाइल अॅप हॅक करण्यात आलं होतं.