Priyanka Gandhi bows to Hanuman : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. दुपारपर्यंत हा निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निकालापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियका गांधी यांनी हनुमानाचे दर्शन घेऊन साकडे घातले. त्यामुळे निवडणुकीनंतर हनुमाना मुद्दा अग्रणी राहणार याची चुणूक काँग्रेसकडून दाखवून देण्यात आली आहे.
कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला. बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंगबली की जयची घोषणा दिली. त्यानंतर निवडणूक प्रचार चांगलाच तापला होता. काँग्रेस हनुमानाच्या विरोधात आहे, असा भाजपकडून प्रचार केला गेला. त्यानंतर काँग्रेसने सगळी हनुमानाची मंदिरे चांगली केली जातील असे स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शिमल्यातील प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिरात प्रार्थना केली. मंदिराच्या भेटीचा व्हिडिओ शेअर करताना पक्षाने म्हटले आहे की, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शिमला येथील प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिरात प्रार्थना केली आणि देशाच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आज कांग्रेस महासचिव श्रीमती @priyankagandhi जी ने शिमला स्थित प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिर में पूजा-अर्चना कर देश की सुख-समृद्धि की प्रार्थना की। pic.twitter.com/IlTXdYAtjN
— Congress (@INCIndia) May 13, 2023
भाजप काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई सुरुवातीच्या कलमध्ये दिसून येत होती. आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप मागे पडला असून काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. शिगगावमधून भाजपचे बोम्मई आघाडीवर आहेत. एकीकरणाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. तर राष्ट्रवादीचा उत्तम पाटील आघाडीवर दिसून येत आहे. कर्नाटकात भाजप 77 , काँग्रेस 115 जागांवर तर जेडीएस 26 जागा आणि अन्य 5 जागावंर आघाडीवर आहेत.
भाजपने निवडणुकीत आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ ट्विट करत आपल्याला आता कोणीही रोखू शकत नाही,असे म्हटले आहे. मी अजिंक्य आहे, मला खूप विश्वास आहे. होय, आज मला कोणी थांबू शकत नाही, असे ते म्हणाले. तर काँग्रेसच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे. कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. तर मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री करावे , अशी मागणी त्यांच्या चिरंजीवाने केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानानंतर आलेल्या बहुतांश मतदानोत्तर सर्वेक्षणांमध्ये (एक्झिट पोल) काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मतमोजणीनंतर हा अंदाज खरा ठरत आहे. तर दुसरीकडे राज्यात पक्षाची सत्ता आल्यास मोठी आश्वासने काँग्रेस दिली होती. यामध्ये सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज (गृह ज्योती) योजना, प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला 2,000 रुपये मासिक मदत (गृहलक्ष्मी) योजना, प्रत्येक दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत (अण्णा भाग्य) योजना इत्यादींचा समावेश आहे.