प्रियंका गांधींचे रात्रभर धरणे, पीडितांना भेटल्याशिवाय जाणार नाही!

सोनभद्र हत्याकांड प्रकरणी पीडितांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी - वाड्रा निघाल्या आणि त्यांना रोखले. त्यांनी रस्त्यातच धरणे धरले.

ANI | Updated: Jul 20, 2019, 11:00 AM IST
प्रियंका गांधींचे रात्रभर धरणे, पीडितांना भेटल्याशिवाय जाणार नाही! title=

मिर्झापूर : काल शुक्रवारी सोनभद्र हत्याकांड प्रकरणी पीडितांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी - वाड्रा निघाल्या. त्यांना पोलिसांनी नायरणपूर येथे रोखले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मिर्झापूर येथे गेस्ट हाऊसला आणले. या ठिकाणी प्रियंका यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. मी पीडितांना भेटल्याशिवाय येथून हलणार नाही आणि जाणारही नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यानी रात्रभर धरणे आंदोलन केले. त्यांनी एक एक अशी नऊ ट्विट करत आपली भूमिका मांडली. दरम्यान, सोनभद्र पोलिसांनी १४४ कलम लागू केले असून ते दोन महिने असणार आहे.

उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनिच्या वादातून हिंसाचारात घडवून आणला गेला. या हत्याकांडात १० जणांना ठार करण्यात आले. या हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी आल्या होत्या. त्यांना रोखून पुढे जाण्यास मनाई करण्यात आली. तरीही आपला निर्धार कायम राखत प्रियंका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ प्रियांका यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठाण मांडून धरणे धरले.

दरम्यान, सोनभद्रमधील हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशचे राजकारण तापले आहे. हे प्रकरण आणखी चिघळणार याचा अंदाज आल्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि अन्य चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. तसेच सरपंच यज्ञ दत्त, त्याचा भाऊ व अन्य २९ जणांना अटक करण्यात आली आहे.

सोनभद्रमधील हिंसाचारात जखमी झालेल्यांची वाराणसी येथील बीएचयू ट्रॉमा सेंटर रुग्णालयात जाऊन प्रियका गांधी यांनी विचारपूस केली. त्यानंतर, त्या सोनभद्रला जायला निघाल्या होत्या. मात्र, त्यांना रोखत एका गेस्ट हाउसला ठेवण्यात आले. त्यानंतर तेथील गेस्ट हाऊचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर, पाणीही बंद करण्यात आले. मात्र, प्रियंका गांधी काही दबल्या नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठाण मांडून धरणे धरले आणि पोलीस तसेच योगी सरकारचा निषेध केला.