रोहतक : बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी गुरमीत बाबा राम रहीम सिंह कारागृहात आहे. मात्र त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत अद्यापही फरार आहे. हरियाणा पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआऊट नोटीस पाठवली आहे.
आतापर्यंत हनीप्रीत संदर्भातील कोणतीच गोष्ट समोर आली नव्हती. मात्र आता तिची १९ वर्ष जुनी असलेली सिक्रेट डायरी एका चॅनलच्या हाती लागलेली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या मनातील सर्व गोष्टी लिहून काढल्या आहेत. या १९ वर्ष जुन्या डायरीत हनीप्रीत आपल्या मनातील सर्व गोष्टी लिहून काढत असे. या डायरीवरून आपण अंदाज लावू शकतो की, हनीप्रीतच्या मनात किती दुःख आहे आणि ती प्रेमासाठी किती आसुसलेली होती. प्रियंका तनेजाची ही डायरी १९९८ वर्षातील असून लग्नाच्या एक वर्षापर्यंत लिहिलेली आहे. ही डायरी १०३ पानांची आहे.
सलमान आणि काजोलची हनीप्रीत खूप मोठी चाहती
डायरीच्या दुसऱ्याच पानावर प्रियंका तनेजा उर्फ हनीप्रीतचं आणखी एक नाव समोर आलं आणि ते म्हणजे "अनू". तिने या नावामध्ये स्वतःचं वर्णन केलं आहे. जसं की, A- Attractive, N - Naughty, U- Unfortunately Girl
त्यापुढे तिने आपल्याला आवडत असलेल्या सलमान आणि काजोलचा फोटो लावला आहे. यावरून अंदाज येतो की ती या दोघांची खूप मोठी फॅन आहे. काजोलबरोबरच तिला तब्बू देखील आवडत असे. तसेच सलमान खानसोबत ती शाहरूख आणि आमीर खानची देखील फॅन आहे. त्यांचे फोटोज तिच्या या सिक्रेट डायरीत पाहायला मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे तिने हिंदी आणि इंग्रजी कविता देखील लिहिल्या आहेत. हनीप्रीतने या डायरीमध्ये शेर आणि शायरी लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. एवढंच काय तर तिने या डायरीमध्ये राम रहीमवर एक गाणं देखील लिहिलं आहे. यावरून अंदाज येतो की ती सुरूवातीपासूनच बाबाला आपलं हृदय देवून बसली होती.