नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)बुधवारी तब्बल १६ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात श्रीनगरमधील ११ तर, राजधानी दिल्लीतील ५ ठिकाणांचा समावेश आहेत. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्यांविरोधात NIAने मोठी मोहीम हाती घेतली आहे. हे छापे या मोहिमेचाच भाग आहेत.
दरम्यान, या प्रकरणात NIAने यापू्र्वीही मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवल्या प्रकरणी फुटीरवादी नेता सैय्यद अली शाह गिलानीचा जावई अल्ताफ शाह याच्यासह सात जणांना त्या वेळी ताब्यात घेण्यात आले. NIAने त्या वेळी केलेल्या छापेमारीत निधीची देवाणघेवाण केल्याचा ताळबंद ठेवलेले रजिस्टर, दोन कोटी रूपये रोख आणि दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन यांसबोत इतर काही दहशतवादी संघटनांचे लेटरहेड सापडले होते.
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांचा तपास करणे आणि त्यांना पैसा पुरवणारांचा शोध घेणे, हा NIAने सुरू केलेल्या कारवाईचा मुख्य उद्देश आहे. यात भारतीय लष्करावर केली जाणारी दगडफेक, शाळांना आग लावणे तसेच, सरकारी संस्थांची तोडफोड करणे, तसा कट करणे या उद्योगात गुंतलेल्यांचा पर्दाफाश करणे आदी मुद्द्यांचाही समावेश आहे. बुधवारी टाकण्यात आलेला छापा हा दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्या आणि त्यांच्याकडून पैसा घेणाऱ्यांचा शोध घेण्याच्या कारवाईचा भाग आहे.
NIA raids at 11 locations in Srinagar and 5 locations in Delhi, in J&K terror funding case. (Visuals from Srinagar) pic.twitter.com/7J4WdAfota
— ANI (@ANI) September 6, 2017
इथे सुरू आहे NIAची शोध मोहीम
- बशीर अहमद कालू, श्रीनगर
- शौकत अहमद कालू, श्रीनगर
- अब्दुल राशिद भट्ट, श्रीनगर
- इकबाल वाणी, श्रीनगर
- सैयद खान, श्रीनगर
- इमरान कौसा, कौसा एण्ड सन्स