मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात भारत आत्मनिर्भर बनला असून या देशांच्या यादीत पुढे जात आहे. कोरोना व्हायरसच्या या लढाईत पीपीई कीट हे सुरक्षा कवच आहे. पीपीई कीट कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास महत्वाची भूमिका बजावत आहे. दोन महिन्यात सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे.
सरकारने गुरूवारी याबाबत माहिती दिली आहे की,भारत दोन महिन्यात सर्वात कमी वेळीत स्वतंत्र पीपीई कीट बनवणारा जगातील दुसरा निर्माता ठरला आहे. भारताच्या अगोदर चीन आहे ज्यांनी सर्वाधिक पीपीई कीटची निर्मिती केली आहे.
पीपीई कीटच्या निर्मितीत आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याच कारणामुळे भारतात दोन महिन्यापेक्षा कमी काळात पीपीई सर्वाधिक तयार करणारा दुसरा निर्माता ठरला आहे. उत्कृष्ठ पीपीई कीटची निर्मिती ही उ्तकृष्ठ दर्जाच्या कंपनीकडेच दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरिअर्सना पीपीई कीट देण्यात येणार आहे.
देशातील कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजारांपेक्षा वर गेली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार आता एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 आहे. यापैकी 3583 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 48 हजार 534 लोकं बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 6088 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 148 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दररोज 5 हजारांच्या पुढे जात आहे. बुधवारीही 5611 रुग्ण वाढले होते. गुरुवारी 5609 रुग्ण वाढले होते. सध्या देशात 66 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.