अहमदाबाद : गेम खेळण्याचे व्यसन कोणाला कधी लागेल आणि त्याचे काय परिणाम होतील, हे स्मार्टफोनच्या दुनियेत कोणीही सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका १९ वर्षांच्या विवाहितेला पबजी खेळण्याचे वेड लागले की तिने पतीलाच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विवाहितेला लहान मूलही आहे. मात्र, तिने चक्क पबजी पार्टनरसाठी पतीकडे मागितला घटस्फोट मागितला आहे. तिचीही मागणी ऐकून पतीलाच धक्का बसला आहे.
या विवाहितेला गेल्या काही महिन्यांपासून पबजीचे वेड लागले आणि आता विवाहितेला पतीशी घटस्फोट घेऊन गेमिंग पार्टनरसोबत रहायचे आहे म्हणत आहे. गुजरातमधील ‘अभयम’ या महिलांच्या हेल्पाइनमध्ये काम करणारा कर्मचाऱ्याने हा किस्सा सांगितला आहे. विवाहितेच्या या फोनमुळे केंद्रातील कर्मचारीही चक्रावून गेले होते. अखेर कर्मचाऱ्यांनी तिला समुपदेशनाचा सल्ला दिला.
गुजरात राज्यात महिलांसाठी ‘अभयम’ (क्रमांक १८१) ही हेल्पलाइन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून महिलांचे समुपदेशन करण्यात येत आहे. दिवसाला ५००च्या घरात फोन येतात. यातील ९० कॉल हे समुपदेशन पथकाकडे वर्ग केले जातात. समुपदेशक संबंधित महिलांच्या घरी जाऊन त्यांचे समुपदेशन करतात.
या हेल्पलाइनवर अहमदाबादमधील १९ वर्षांच्या विवाहित महिलेचा फोन आला होता. महिलेला एक मुलगा असून त्याचे वय एक वर्षांपेक्षा कमी आहे. या विवाहितेचा फोन कर्मचाऱ्यांसाठी चक्रावून टाकणारा होता. विवाहित महिलेला पबजी खेळण्याची आवड निर्माण झाली आणि ती त्या खेळाच्या आहारी गेली. हा गेम खेळताना महिलेची अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी ओळख झाली. आता त्या महिलेला पतीला सोडून पबजी मधील गेमिंग पार्टनरसोबत लग्न करायचे आहे.
हेल्पलाइनवरील कर्मचाऱ्यांनी महिलेला समुपदेशकांकडे पाठवले आहे. तिला पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला गेला आहे. सगळ्या बाबी समजून सांगितल्या आहेत. आम्ही तिला मुलाकडे पाहून भविष्याबाबत निर्णय घे असा सल्लाही देण्यात आलाय. आता तिला निर्णय घ्यायचा आहे, असे येथील समुपदेशकांना सांगितले.