मुंबई : पंजाबमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Election 2022) भाजपने जोरदार तयारी सुरु केलीये. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी यासाठी युतीचे संकेत दिले आहेत. भाजप पंजाबमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) आणि शिरोमणि अकाली दलाचे माजी नेते सुखदेव सिंह ढिंढसा (Sukhdev Singh Dhindsa) यांच्यासोबत चर्चा करत आहेत.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शनिवार बोलताना म्हटलं की, 'आम्ही कॅप्टन साेब (अमरिंदर सिंह) आणि ढिंढसा साहेब (सुखदेव सिंह ढिंढसा) याच्यासोबत चर्चा करत आहोत. आम्ही दोघांसोबत युती करु शकतो. आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे.'
शेतकरी आंदोलनाबाबत अमित शाह (Amit Shah) यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेऊन त्यांचं मोठं मन दाखवलं आहे. आता पंजाबमध्ये दुसरा कोणता मुद्दा आहे?
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh) हे काँग्रेसपासून वेगळे झाले आहेत. त्यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली आहे. तर ढिंढसा यांनी शिरामणि अकाली दल सोडून शिरोमणि अकाली दल (संयुक्त) नावाने नवा पक्ष सुरु केलाय.
पंजाबमध्ये भाजप अनेक काळापासून शिरोमणि अकाली दल यांच्यासोबत युतीमध्ये होते. पण पंजाब विधानसभा निवडणूक (Punjab Assembly Election 2022) काही महिन्यांवर असताना दोघांची युती तुटली. कृषी कायद्याच्या मुद्द्यावर युती तुटली.
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे आणि पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोर लावत आहे.
'यूपी में बीजेपी फिर सरकार बनाएगी'
गृहमंत्री (Amit Shah) यांनी म्हटलं की, 'आपण आधी पण पाहिलं आहे की, जेव्हा सपा आणि काँग्रेसने हात मिळवणी केली त्यानंतर तिन्ही (सपा, बसपा आणि काँग्रेस) एकत्र आले. यानंतर ही भाजपचा विजय झाला. लोक जागरूक आहेत. वोट बँकच्या आधारावर केलेली हातमिळवणी आता काम नाही करत.'
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे. त्यांनी म्हटलं की, 'मी उत्तर प्रदेशात गेलो होतो. विश्वासासह सांगतोय की, भाजप पुन्हा बहुमतासह सत्ता स्थापन करेल.'