'मी जिवंत परतू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी, पंतप्रधान संतापले

Updated: Jan 5, 2022, 04:15 PM IST
'मी जिवंत परतू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा' title=

PM Narendra Modi in Punjab : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर इथली रॅली रद्द करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे. फिरोजपूरमधील रॅली पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणामुळे रद्द करण्यात आली आहे. 

नवीन कृषी कायदे रद्द (New Agriculture Laws) केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पंजाबच्या दौऱ्यावर (PM Narendra Modi Punjab Visit) जाणार होते आणि ते फिरोजपूरलाही रवाना झाले होते, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव रॅली रद्द करावी लागली.

पंतप्रधान मोदी संतापले
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधानांची मोठी सभा होणार होती. मात्र आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा रस्त्यावरच अडवला. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा दिल्लीला परतला. यावेळी  एएनआयशी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेमुळे पीएम मोदी खूप संतापले आहेत. सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी म्हटलं  की, त्यांच्या 'मुख्यमंत्र्यांचे आभार, मी विमानतळावर जिवंत परत येऊ शकलो'.

पीएम मोदी भटिंडा विमानतळावर परतत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना हा संदेश दिल्याचं  सांगण्यात येत आहे. त्यांनी स्पष्टपणे पंजाबचे सीएम चन्नींवर निशाणा साधला.