PNB Bank Scheme: सरकारी योजनांचा (Central Government Scheme) आपल्याला पुरेपुर फायदा घेता येतो. यातून आपल्याला अनेक प्रकारची सूटही मिळते त्यामुळे आपल्यालाही अनेक पर्याया खुले होतात. लघु गुंतवणूक करण्यापेक्षा आपल्याला अशा योजनांतून दीर्घ कालीन गुंतवणूक (Long Term Investment) करण्याची मुभा आपल्याला मिळते. यातून लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपल्याला या योजनांमधून चांगला फायदा मिळतो. त्यातील अशीच एक योजन आहे आणि ती म्हणजे पंजाब नॅशनल बॅंकची (Punjab National Bank). या बॅंकेच्या योजनेतून विविध श्रेणीतील मेच्युअर होणारी एफडी मिळणार आहे. ज्यात तुम्हाला 8.5 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळेल. पीएनबीच्या या फिक्स्ड डिपोसिट स्किममधून (PNB Fixed Deposit Scheme) तुम्हाला जेवढं जास्त वय तेवढं जास्त व्याज मिळणार आहे. ही योजना 20 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
या सरकारी योजनेतून रेग्यूलर कस्टमर (Regular Customer), सीनियर सिटीजन (Senior Citizen) आणि सुपर सिनियर सिटीजन (Super Senior Citizen) यांना या योजना फायदा घेता येईल. रेग्यूलर कस्टमर म्हणजे 60 या वयोमर्यादेपर्यंतचे ग्राहक, सीनियर सिटीजन म्हणजे 60 वरील आणि सुपर सीनियर म्हणजे 75 पेक्षा वरील ग्राहक. रेग्युलर कस्टमरसाठी तुम्हाला वर्षांला 6.8 टक्के व्याज (Interest Rate) मिळेल.
सीनियर सिटीजनला 7.3 टक्के व्याज मिळू शकते. तर सुपर सीनियर सिटीजनला 7.6 टक्क्यांचे व्याज मिळेल. यात 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतचे एफडी (FD) करता येते.
जर तुम्ही 2 वर्षासाठी 5 लाख रूपयांचे एफडी काढालं असाल तर 6.8 टक्क्यांनुसार, तुम्हाला फायदा होईल. तुम्ही या योजनेतून 1.5 लाखांपर्यंत तुम्हाला टॅक्स वर सूट मिळेल. यासाठी 5 वर्षांचा लॉन इन पीरियड असतो. 10 वर्षांपर्यंत हा काळ वाढू शकतो.
तुम्ही जर का रेग्युलर कस्टमर असाल तर तुम्हाला 271 दिवस ते 1 वर्षांपर्यंत कमी कालावधीसाठी 5.8 टक्के व्याज मिळेल. याच कालावधीसाठी सीनियर सिटीजनला 6.3 टक्के तर सुपर सीनियर सिटीजला 6.6 टक्के व्याज मिळेल. 1 वर्षासाठी रेग्युलर कस्टमरला 6.8 टक्के, सीनियर सिटीजनला 7.3 टक्के तर सुपर सीनियर सिटीजनला 7.6 टक्के व्याज मिळते. 1 वर्षे आणि त्यातूनही जास्त कालावधीसाठी हेच दर लागू आहेत. तुम्ही जर 666 दिवसांसाठी घेणार असाल तर रेग्युलरला 7.25 टक्के, सीनियरला 7.75 टक्के आणि सुपर सीनियरला 8.05 टक्के असे व्याज मिळते. 5 वर्षांसाठी रेग्युलरला 6.5 टक्के तर सीनियरला 7.0 टक्के आणि सुपर सीनियरला 7.3 टक्के व्याज मिळू शकते.