Bank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री

बँकेने व्याजदरात वाढ केली ​​आहे. याबद्दलची माहिती स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE ला दिली आहे.

Updated: Sep 1, 2022, 01:00 PM IST
Bank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री title=

PNB Interest Rate Hike : जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे खातेधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो दरात वाढ केल्यानंतर आता व्यावसायिक आणि सरकारी बँका त्यांचे व्याजदर वाढवत आहेत.

नुकतेच, पंजाब नॅशनल बँकेनेही (Punjab National Bank) व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेने याबद्दलची माहिती PNB ने स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE दिली आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) वाढवला आहे आणि हे नवीन दर 1 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू होतील. याचा अर्थ असा की, आजपासून पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेणं महागणार आहे.

बँकेने BSE ला काय दिली माहिती ?

पंजाब नॅशनल बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लँडिंग रेट वाढवण्याबाबत स्टॉक मार्केट (Stock Exchange) एक्सचेंजला माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेने व्याजदरात 0.05 टक्के म्हणजेच 5 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बँकेने सर्व कालावधीसाठी व्याजदरात किती वाढ केली आहे ते जाणून घेऊया...

'हे' आहेत बँकेचे नवीन व्याजदर

MCLR टेन्योर        जुने दर                 नवीन दर
रात्रभर                    7.00%                  7.05%
1 महिना                 7.05%                  7.10%
3 महिने                  7.15%                  7.20%
6 महिने                  7.35%                  7.40%
1 वर्ष                     7.65%                  7.70%
3 वर्षे                     7.95%                   8.00%