Kiss कसं करायचं ते 'या' सशाकडून शिकावं, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही होईल त्यांच्यावर प्रेम!

Kiss करण्यासाठी या सशानं जी युक्ती वापरली ती पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल, एकदा हा व्हिडीओ पाहाच

Updated: Aug 1, 2021, 11:00 PM IST
Kiss कसं करायचं ते 'या' सशाकडून शिकावं, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही होईल त्यांच्यावर प्रेम!

मुंबई: नुकतंच बोरिवलीमध्ये नो किस झोन तयार करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्युट व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही बाकी काही नाही पण या सशांच्या नक्कीच प्रेमात पडाल. सध्या सोशल मीडियावर या सशांची खूप चर्चा आहे. अहो का काय विचारता? हे ससे सध्या किसचे धडे देत आहेत.

सोशल मीडियावर एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोन ससे दिसत आहेत. पहिल्या सशाला दुसऱ्या सशाला किस करायचं आहे पण करणारं कसं. या सशाच्या डोक्यात बहुतेक अनेक प्रश्न पडले असावेत. म्हणून तो सुरुवातीला थोडा अंदाज घेतो. आधी एक पाऊल पुढे येऊन आणि नंतर आळस देऊन हा ससा अंदाज घेतो. 

हऴूहळू जवळ येत हा ससा दुसऱ्या सशाला किस करतो. दुसरा ससा मात्र आपल्या समोर असलेली गोष्ट खाण्यात मग्न असतो. या व्हिडीओची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे.  buitengebieden नावाच्या युझरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हा ससा किस घ्यायच्या तयारीत दुसऱ्या सशाजवळ पोहोचतो. तोच दुसरा पांढऱ्या रंगाचा ससा त्याला चाटू लागतो. buitengebieden नावाच्या युझरनं किस कसं घ्यावे असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

297.4 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आतापर्यंत 3.4 हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. अनेक युझर्सनी आपल्याकडे असलेल्या सशाचे फोटो कमेंटमध्ये शेअर केले आहेत.