2 रुपयाचं हे नाणं द्या आणि 5 लाख मिळवा, कसं आणि कुठे शक्य आहे लगेच माहित करुन घ्या

आम्ही हे सांगत आहोत की, कारण अशी नाणी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत कमऊ शकता.

Updated: Aug 1, 2021, 07:31 PM IST
2 रुपयाचं हे नाणं द्या आणि 5 लाख मिळवा, कसं आणि कुठे शक्य आहे लगेच माहित करुन घ्या

मुंबई : अनेक लोकांना जुण्यावस्तु जमा करण्याचा छंद असतो, ज्यात काही लोकं पैसे, दगड, व्हिंटेज वस्तु जमा करतात. जगभरात तुम्हाला असे अनेक लोक मिळतील ज्यांना जुनी नाणी गोळा करण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे खूप जुनी आणि दुर्मिळ नाणी असतात. असे लोकं त्यांच्या आवडी आणि काही तरी वेगळं करण्याच्या त्यांच्या छंदासाठी जास्त पैसे देण्याची देखील तयारी दाखवतात.

तुमच्या घरात देखील जुनी नाणी असण्याची शक्यता आहे. आम्ही हे सांगत आहोत की, कारण अशी नाणी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत कमऊ शकता.

देशी आणि विदेशी अशी अनेक नाणी आहेत, जी खूप पूर्वी बंद झाली आहेत आणि ही नाणी आता दुर्मिळ दिसत आहेत. त्यामुळे काही नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्या व्यक्ती तुम्हाला अशा नाण्यांची जास्क किंमत मोजू शकतात.

जुन्या नाण्यांची किंमत लाखात

पैशाच्या व्यवहारादरम्यान अनेक वेळा, आपण समोरच्या व्यक्तीला देत असलेले नाणे किती मौल्यवान असू शकतात याकडे आपण लक्ष देत नाही. परंतु आजकाल जुन्या नोटा आणि नाण्यांचा ट्रेंड वाढत आहे. यामुळे तुम्ही अंदाजही लावू शकत नाही तितके त्यांचे मूल्य असु शकते.

परंतु आता तुम्ही म्हणाल की, कोणला यासाठी संपर्क करायचा? कुठे अशी नाणी विकायची तर, यासाठी गुगलवरती तुम्हाला अनेक वेबसाइट्स मिळतील ज्या तुम्हाला नाण्यांच्या बदली पैसे देतील. तसेच आम्ही देखील अशा काही वेबसाईट्बद्दल माहिती देणार आहोत.

2 रुपयांचे नाणं कसे असावे?

क्विकर या ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक प्रकारच्या नाण्यांची विक्री सुरू आहे. त्यामध्ये त्यांना एक असं नाणं पाहिजे जे 1995 सालचे आहे. या नाण्याच्या मागील बाजूस भारताचा नकाशा आणि त्या नकाशात ध्वज आहे. जर तुमच्याकडे असे नाणे असेल, तर तुम्ही त्यातून लाखो रुपये मिळवू शकता.

अशा नाण्याची किंमत क्विकर वेबसाइटवर 5 लाख रुपये देण्यात आली आहे. या वेबसाईटवर इतर अनेक प्रकारच्या नाण्यांना मागणी आहे.

त्याचप्रमाणे, भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले एक रुपयाचे चांदीचं नाण्यावर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात. तर सम्राट जॉर्ज वी किंग राजाच्या 1918 च्या एका रुपयाच्या ब्रिटिश नाण्याची किंमत  9 लाख रुपयांपर्यंत आहे.

नाणं विकण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?

जर तुमच्याकडे या दुर्मिळ नाण्यांपैकी एक आहे आणि जर ते विकायचे आहे तर तुम्हाला सर्वप्रथम साइटवर ऑनलाइन विक्रेता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही घरी बसून ते अगदी सहज विकू शकता. त्याची संपूर्ण माहिती https://www.quikr.com/home-lifestyle/rare-indian-coin-gurgaon/p/354498004 वर तुम्हाला मिळेल. येथे तुमचे नाव, नंबर, ईमेल इत्यादी भरून तुमचे खाते नोंदणी करा. आता तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

येथे 2 प्रकारचे पर्याय आहेत. नाणे खरेदी करण्यासाठी आत्ताच खरेदी करा आणि विक्रीची ऑफर द्या. या नाण्यासाठी तुम्हाला मेक ऑफर वर क्लिक करावे लागेल. तुम्ही नाण्याचा फोटो घ्या आणि अपलोड करा. यानंतर विक्रेता तुमच्याशी थेट संपर्क साधेल. तुम्ही तुमचे नाणे ऑनलाईन डिलिव्हरी आणि पेमेंट सिस्टम द्वारे विकू शकता.