Rahul Gandhi New Look : 'भारत जोडो यात्रे'नंतर राहुल गांधी नव्या लूकमुळे चर्चेत, फोटो व्हायरल

Rahul Gandhi New Look : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ​)  चक्क लेक्चररच्या (lecturer) भूमिकेत असणार आहे. राहुल गांधी हे 7 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर गेलेत. यावेळी ते केम्ब्रिज विद्यापीठात (Cambridge University) लेक्चर देणार आहेत. मात्र इंग्लंडला जाण्याआधी राहुल हे नव्या लूकमुळे चर्चेत आलेत.  

Updated: Mar 1, 2023, 10:22 AM IST
Rahul Gandhi New Look : 'भारत जोडो यात्रे'नंतर राहुल गांधी नव्या लूकमुळे चर्चेत, फोटो व्हायरल title=
Rahul Gandhi New Look

Rahul Gandhi New Look : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) आता नव्या भूमिकेत दिसणार आहेत. ते चक्क लेक्चररच्या (lecturer) भूमिकेत असणार आहे. राहुल गांधी हे 7 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर गेलेत. यावेळी ते केम्ब्रिज विद्यापीठात (Cambridge University) लेक्चर देणार आहेत. मात्र इंग्लंडला जाण्याआधी राहुल हे नव्या लूकमुळे चर्चेत आलेत. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आपली दाढी वाढवली. त्यानंतर लोकसभा अधिवेशनाच्यावेळी संसदेतही ते दाढी वाढवलेल्या स्थितीतच आले. 

आता राहुल गांधी यांनी आपली दाढी मस्त ट्रीम केलीय. कोट टाय आणि ट्रीम केलेली दाढी यामुळे राहुल गांधी यांचा लूक बदलून गेलाय. राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात लर्निंग टू लिसन ईन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी या विषयावर व्याख्यान देणार आहेत. यावेळी ते बिग डेटा, लोकशाही आणि भारत चीन संबंधांवरही बोलतील. 

राहुल गांधी यांचा नवा लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल हे आधी भारत जोडो यात्रेदरम्यान वाढविलेल्या लांब दाढी आणि केसांसिवाय दिसत आहेत. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत 145 दिवसांच्या पायी पदयात्रेच्या समाप्तीनंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. राहुल गांधी यांनी पायी 4,000 किमीचा प्रवास केला.

राहुल गांधी पुन्हा नवा दौरा करणार?

दरम्यान, राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेनंतर आता भारत जोडो यात्रा पार्ट-2 वर जाण्याचा विचार करत आहेत. रायपूरमधील तीन दिवसीय काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनातही याचे संकेत देण्यात आले आहेत. राहुलचा हा कार्यक्रम अरुणाचल प्रदेशातून सुरु होऊन गुजरातमध्ये संपेल. या यात्रेचे नाव अद्याप ठरलेले नसून, या यात्रेचे नाव 'तपस्या यात्रा' असू शकते, असे बोलले जात आहे. राहुल गांधींच्या दौऱ्याची चर्चा सुरु झाल्याने गुजरातमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उत्साहाच्या शोधात असलेल्या पक्षाला 2024 पासून निवडणुकीपूर्वी मोठ्या बुस्टर डोसची गरज आहे. राहुल दीर्घकाळानंतर गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.