Rahul Gandhi Truck Travel : काँग्रेस नेते राहुल गांधी लोकांमध्ये जात आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अनेकदा लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. कधी ते विद्यार्थ्यांना भेटतात तर कधी बाजारात दिसतात. आता ते सोमवारी रात्री ट्रक मधून प्रवास करताना दिसलेत. राहुल यांनी दिल्लीत चंदीगडपर्यंत ट्रकमध्ये प्रवास केला. ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी हा प्रवास केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेसने ट्विट केले की, 'लोकनेते राहुल गांधी ट्रक चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ट्रकने प्रवास केला. ट्रक चालकांसोबत राहुल यांनी दिल्ली ते चंदीगड असा प्रवास केला.
काँग्रेसने ट्विट केले की, 'मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात सुमारे 90 लाख ट्रक चालक आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत, त्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेतले.
दरम्यान, राहुल यांचा कोणताही अधिकृत कार्यक्रम नसल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले. असा अंदाज बांधला जात आहे की ते शिमला येथे जात आहेत. जिथे त्यांची बहीण प्रियंका गांधी कुटुंबासह उपस्थित आहे.
जननायक @RahulGandhi जी ट्रक ड्राइवर्स की समस्या जानने उनके बीच पहुंचे।
राहुल जी ने उनके साथ दिल्ली से चंडीगढ़ तक का सफर किया।
मीडिया रिपोर्ट्स के मुताबिक, भारत की सड़कों पर करीब 90 लाख ट्रक ड्राइवर्स हैं। इनकी अपनी समस्याएं हैं। इनके 'मन की बात' सुनने का काम राहुल जी ने किया। pic.twitter.com/Bma2BCjGpY
— Congress (@INCIndia) May 23, 2023
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली. यानिमित्ताने राहुल गांधी लोकांमध्ये जात आहेत. गेल्या महिन्यात ते दिल्लीच्या बंगाली मार्केटमध्ये गोल गप्पा खाताना दिसले होते. ते चांदणी चौकातही गेले. जिथे त्यांनी मोहब्बत का शरबत नावाचे टरबूज पेय प्याले. यानंतर ते कबाब खाण्यासाठी अल जवाहर रेस्टॉरंटमध्ये गेले. राहुल गांधी दिल्लीच्या मुखर्जी नगरमध्येही दिसले जेथे त्यांनी यूपीएससी आणि एसएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटले. त्यांच्याशी संवाद साधला.
तसेच राहुल गांधी यांनी दिल्लीतील शकूरबस्ती रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टीला भेट दिली. तेथे राहणाऱ्या महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी 'घरावर बुलडोझर चालण्याची भीती', महागाई आदी समस्यांचा पाढा ऐकवला. काँग्रेसने राहुल गांधींच्या महिलांसोबतच्या भेटीचा व्हिडिओही जारी केला होता. व्हिडिओमध्ये काही महिला महागाई आणि विशेषत: एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीबद्दल तक्रार करताना दिसत होत्या.