रायबरेली अन् वायनाडमध्ये राहुल गांधींनी उधळला विजयाचा गुलाल, अशी कामगिरी करणारे एकमेव खासदार

Wayanad Lok Sabha Result 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट असलेल्या रायबरेली येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव केला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Jun 4, 2024, 05:09 PM IST
रायबरेली अन् वायनाडमध्ये राहुल गांधींनी उधळला विजयाचा गुलाल, अशी कामगिरी करणारे एकमेव खासदार title=
Rahul Gandhi Win in raebareli and wayanad loksabha

Lok Sabha Election Result 2024 : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे यूपीच्या हायप्रोफाईल लोकसभा सीट असलेल्या रायबरेली (Raebareli) येथून भाजप उमेदवार दिनेश प्रताप सिंग यांचा निवडणुकीत पराभव केला आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांचा 4 लाखाहून अधिक मतांनी विजय झाला आहे. तसेच राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातून देखील विजय मिळवला असल्याने आता राहुल गांधी यांनी दुहेरी आनंद लोटला आहे. दोन्ही जागेवर विजय मिळवल्यानंतर राहुल गांधी हे दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातून निवडून येणारे एकमेव खासदार ठरले आहेत. मात्र यासोबतच त्यांच्यासमोर मोठे धार्मिक संकटही निर्माण होणार आहे. 

रायबरेली मतदारसंघातून राहुल गांधी यांनी तब्बल 4 लाख मतांनी विजय मिळवला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातील भारतीय जनता पक्षाचे दिनेश प्रताप सिंह यांचा पराभव झालाय. रायबरेलीमध्ये भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी निवडणुकीतील पराभव मान्य केला आहे. केरळमधील वायनाडमधूनही राहुल गांधी यांनी 3 लाखांहून अधिक मतांची विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालाय. 

राहुल गांधी यांच्यासमोर पेच

राहुल गांधी यांना आता दोन्ही विजयी जागेपैकी एका जागा सोडावी लागणार आहे. अशातच राहुल गांधी रायबरेलीची जागा सोडू शकतात आणि रायबरेलीचा वारसा प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवू शकतात, अशीही चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. राहुल गांधी वायनाडमधून 4.37 लाख मतांनी विजयी झाले होते, पण अमेठीमध्ये त्यांचा स्मृती इराणींनी पराभव केला होता. अशातच आता राहुल गांधी यांनी जोरदार कमबॅक केलं असून रायबरेली अन् वायनाड या दोन्ही मतदारसंघातून विजयाचा गुलाल उधळला आहे.