नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा शेवटचं संपूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अरुण जेटलींनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी टीका केली आहे. या बजेटमध्ये असं काहीच नाही ज्याची प्रशंसा केली जाईल, असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.
चार वर्ष पूर्ण झाली पण शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. चार वर्षांमध्ये घोषणा झाल्या पण अर्थसंकल्पाशी त्याचं काही देणंघेणं नाही. या बजेटकडे बघून खुश होण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे बरं झालं आता फक्त एकच वर्ष उरलं, असा टोला राहुल गांधींनी लगावला आहे.
4 years gone; still promising FARMERS a fair price.
4 years gone; FANCY SCHEMES, with NO matching budgets.
4 years gone; no JOBS for our YOUTH.
Thankfully, only 1 more year to go.#Budget2018— Office of RG (@OfficeOfRG) February 1, 2018
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेची प्रतिक्रीया सरकारसाठी चिंता वाढवणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जोडलेले मजूर संघाने या बजेटवर निशाणा साधला आहे. या बजेटमुळे भारतीय मजूर संघ निराशा आहे आणि याविरोधात ते शुक्रवारी संपूर्ण देशात त्याचे प्रदर्शन करणार. आरएसएस नव्हे तर शिवसेनाने देखील या बजेटवर टीका केली आहे.