नवी दिल्ली : सणासुदीच्या सुरूवातीलाच आनंदाची बातमी आज केंद्रीय कॅबिनेटनं १२ लाख कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राजपत्रित कर्मचाऱ्यांना मात्र हा बोनस मिळणार नाहीय.
दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यंदा प्रति रेल्वे कर्मचारी १७,९५० रुपये बोनस म्हणून मिळणार आहेत. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचं वेतन बोनस म्हणून दिलं जातं. रेल्वेच्या जवळपास १२ लाख नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल.
ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन (AIRF) च्या मागण्या मान्य करत बोर्डानं ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. हा बोनस रेल्वेच्या क्लास थ्री आणि फोर कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आरपीएफ कर्मचाऱ्यांनाही या बोनसचा लाभ मिळणार आहे.