सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

सिंधुताई सपकाळ यांना आणखी एक पुरस्कार जाहीर

Updated: Oct 10, 2018, 02:09 PM IST
सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर title=

पुणे : अनाथांची माय अशी सार्थ उपाधी प्राप्त झालेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. १४ ऑक्टोबरला शानदार सोहळ्यात सिंधुताईंचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

अनाथ मुलांचा सांभाळ करत त्यांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम सिंधुताई यांनी केलं आहे. यासाठी त्यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुणे येथील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे त्यांनी ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या मार्फत सिंधुताईंनी अनेक अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला आहे.

सिंधुताई सपकाळ यांनी या संस्थेच्या प्रचारासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देखील हजेरी लावली आहे. यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची देखील स्थापना केली आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारीत एक सिनेमा देखील आला आहे.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार

पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार.
मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार.
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार १९९६.
सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
राजाई पुरस्कार.
शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे सामाजिक सहयोगी पुरस्कार
सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनचा रिअल हीरो पुरस्कार
दैनिक लोकसत्तेचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार.
प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार 
डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार