श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये मजुरांचा मृत्यू झाल्याची रेल्वेकडून कबुली

श्रमिक स्पेशल ट्रेनने आतापर्यंत 52 लाखहून अधिक मजुरांनी प्रवास केला आहे.

Updated: May 30, 2020, 02:03 PM IST
श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये मजुरांचा मृत्यू झाल्याची रेल्वेकडून कबुली
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी 1 मेपासून सुरु झालेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनने आतापर्यंत 52 लाखहून अधिक मजुरांनी प्रवास केला आहे. मात्र श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये काही मजुरांचा मृत्यू झाल्याची रेल्वेकडून कबुलीही देण्यात आली आहे. 

रेल्वे बोर्डचे अध्यक्ष, विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 3840 श्रमिक ट्रेन चालवण्यात आल्या आहेत. ज्या राज्यांनी जितक्या ट्रेनची मागणी केली आहे, त्या-त्या राज्यांना मागणीनुसार ट्रेन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. राज्यांकडून हळू-हळू श्रमिक स्पेशल ट्रेनची मागणी कमी होत असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 

आतापर्यंत 80 टक्के मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रवाना झाले आहेत. मजूरांना त्यांच्या स्थानापर्यंत, योग्य वेळी पोहोचवण्याचा रेल्वे प्रयत्न करत आहे. श्रमिक स्पेशल ट्रेनमधील प्रवासादरम्यान काही लोकांचा मृत्यू झाला असल्याचं रेल्वेकडून कबुल करण्यात आलं आहे. मात्र किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत माहिती मिळवली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय; राज्यात १ जूनपासून धार्मिक स्थळं सुरु करणार