काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

Updated: May 30, 2020, 12:29 PM IST
काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. ही दुसरी मोठी कारवाई आहे.

दहतवाद्यांची घुसखोरी सुरु आहे. गेल्या आठवड्यातही चकमक झाली होती. तेव्हापासून जम्मू-काश्मीर येथे सर्च ऑपरेशन सुरु आहे. कुलगाम परिसरात अजूनही शोधमोहीम सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील या जिल्ह्यातील वानपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर हा परिसर घेरला गेला होता आणि शोधमोहीम राबविण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला. याला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

दरम्यान, एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.