राज आणि शिल्पा यांच्या अडचणीत वाढ! भरावा लागणार 3 लाखांचा दंड

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आता सेबीच्या रडारवर आहे.

Updated: Jul 29, 2021, 12:36 PM IST
 राज आणि शिल्पा यांच्या अडचणीत वाढ! भरावा लागणार 3 लाखांचा दंड

मुंबई : पोनोग्राफी प्रकरणात अटक झालेला राज कुंद्रा आण बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा आता सेबीच्या रडारवर आहे. सेबीने शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्यावर कारवाई केली आहे. बुधवारी Securities and Exchange Board of Indiaकडून यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शिल्पा आणि राज यांच्यासोबत वियान इंडस्ट्रीजला देखील शेअर्स ट्रेडिंगमध्ये अंतर्गत व्यापार नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी मानत तीन लाख रुपयांचा दंड आकारला आहे. सेबीने बुधवारी कारवाई करत अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा नवरा राज कुंद्रा आणि वियान इंडस्ट्रीजवर 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी वियान इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये ट्रेडिंगसंदर्भात चौकशी केली. पूर्वी या कंपनीचे नाव हिंदुस्तान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज लिमिटेड होतं.

सेबीने केलेल्या चौकशीत असं आढळलं की, 1 सप्टेंबर, 2013 ते 23 डिसेंबर 2015 दरम्यान राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि वियान इंडस्ट्रीजने सेबीच्या नियमन क्रमांक 7(2)(a) आणि 7(2)(b) च्या तरतुदींचं उल्लंघन केलं.सेबीने आदेशात म्हटल्याप्रमाणे, 29 ऑक्टोबर 2015 रोजी चार व्यक्तींना कंपनीकडून 5 लाख इक्विटी शेअर्सचं वाटप करण्यात आलं. शिल्पाला प्रत्येकी 1,28,800 शेअर वाटप करण्यात आलं होतं.

राज कुंद्रा तुरूंगात

मंगळवारी कोर्टाने राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावली आहे. आता मुंबई न्यायालयात राजच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली आहे. या सुनावणीत राज याला मोठा झटका बसला आहे. राज कुंद्राचा जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे.