Lockdown : धोका वाढला, 'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन, केंद्र सरकार पाठवणार टीम

Complete Lockdown to be imposed in Kerala: केरळमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.  

Updated: Jul 29, 2021, 12:14 PM IST
Lockdown : धोका वाढला, 'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन, केंद्र सरकार पाठवणार टीम title=

मुंबई  : Complete Lockdown to be imposed in Kerala: केरळमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. केरळमध्ये कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे आता राज्यात 31 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान पूर्ण लॉकडाऊन (Complete Lockdown) लागू केला गेला आहे. दरम्यान, हा लॉकडाऊन दोन दिवसांचा असेल. त्याचबरोबर केंद्र सरकार सहा सदस्यांची टीम पाठवित आहे. केरळ सरकारने लॉकडाऊनबाबत आज गुरुवारी ही घोषणा केली आहे. (Lockdown in Kerala News)

 6 सदस्यीय पथक केरळला जाणार

केरळ सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील वाढत्या कोविड 19च्या रुग्णसंख्या वाढीमुळे 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी केरळमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू केले जाईल. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया म्हणाले, सरकार राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय पथक केरळला पाठवित आहे. केरळ अजूनही मोठ्या संख्येने कोविडच्या घटनांत वाढ होत आहे. ही टीम कोविड व्यवस्थापनात सध्या सुरू असलेल्या प्रयत्नात राज्याला मदत करेल.

केरळमध्ये 24 तासांत 22056 नवीन रुग्ण 

बुधवारी केरळमध्ये न 24 तासांत कोविड -19 चे 22056 नवीन रुग्ण आढळले आणि संसर्ग होण्याची एकूण संख्या 33 लाख 27 हजार 301 इतकी झाली आहे, तर या विषाणूमुळे 131 मृत्यू झालेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 16457 पर्यंत वाढली आहे.  या दरम्यान, 17761 लोक कोरोनातून बरे झाले होते, त्यामुळे एकूण बरे झालेल्या लोकांची संख्या 31 लाख 60 हजार 804 वर गेली आहे आणि आता राज्यात कोरोना  सक्रिय रूग्णांची संख्या 1 लाख 49 हजार 534 आहे.

केरळमध्ये गेल्या चार आठवड्यांपासून केरळमधील कोरोना संसर्गाचा आलेख सतत वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 1 लाख 96 हजार 902 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि संसर्ग दर 11.2 टक्के नोंदविला गेला. राज्यभरात आतापर्यंत 2 कोटी 67 लाख 33 हजार 694 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.